News Flash

दोन किमी परिघातच संचाराची अट रद्द

घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबई : घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवासमुभा देण्याच्या मुंबई पोलिसांच्या अटीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी ही अट रद्द करून घराजवळच खरेदी करण्याचे आवाहन केले. पोलिसांनाही त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन किलोमीटर परिघाबाबतच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्र वारी तीव्र नाराजी व्यक्त के ली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलिसांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतल्यावर घराजवळच खरेदी करा, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी के ले, तर दोन किमीची अट रद्द केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा टाळेबंदी लागू करणे, मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्र वारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा के ली.

मुंबईत रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त के ली.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी, समाज माध्यमातून ‘घराजवळच खरेदी करा, व्यायामासाठी घराजवळील मोकळ्या जागेत जा, असे नवे आवाहन शुक्रवारी केले. तर मुंबईत निर्बंध लागू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेतही दोन किमी परिघाची मर्यादा घालण्यात आलेली नाही.

प्रवासासाठी फक्त दोन किमी अंतराची अट घालण्याच्या आदेशावर प्रतिक्रि या उमटली होती. त्यामुळेच घराजवळ खरेदी करण्याचा पर्याय असावा, अशी सूचना मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे. लोकांनीही घराजवळच खरेदीसाठी जावे. 

       – अनिल देशमुख, गृहमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:39 am

Web Title: government revoked the condition of the mumbai police to allow travel within two kilometers zws 70
Next Stories
1 ‘ऑनलाइन शाळा, ऑफलाइन शिक्षण’ परिसंवाद
2 अतिमध्यम लक्षणे असल्यास घरीच विलगीकरण
3 करोना संशयितांच्या मृतदेहांची चाचणी न करण्याचा नियम सदोष
Just Now!
X