28 January 2021

News Flash

आयपीएलवरील ६५० कोटीचा कर वसूल करण्याची मागणी

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना गेल्या पाच वर्षांत आयपीएल क्रिकेट सामन्यांना राज्य शासनाने सुमारे ६५० कोटी रुपयांची मनोरंजन करमाफी राज्य सरकारने दिली असून ही रक्कम वसूल

| March 10, 2013 02:49 am

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना गेल्या पाच वर्षांत आयपीएल क्रिकेट सामन्यांना राज्य शासनाने सुमारे ६५० कोटी रुपयांची मनोरंजन करमाफी राज्य सरकारने दिली असून ही रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. राज्य शासनाने २००९ पासून आयपीएलबाबत बोटचेपे धोरण स्वीकारले असून भाजपने उच्च न्यायालयात याबाबत धाव घेतली होती. त्यानंतर क्रिकेट सामन्यांवर २० जानेवारी २०१० रोजी आयपीएल सामन्यांवर कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आपल्या अधिकारात तो माफ केला. त्यामुळे मनोरंजन कर व पोलीस संरक्षणाचा खर्च असे सुमारे ६५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम आयपीएलकडून वसूल करण्यात यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2013 2:49 am

Web Title: government should collect 650 crore from ipl as a tax
टॅग Ipl,Tax
Next Stories
1 अंबरनाथमध्ये मोबाइल टॉवरचा विळखा महिलांनी झुगारला
2 मोबाइल नव्हे; ‘जीवघेणा जिवलग’
3 ‘एस्मा’ लावूनच बघा; आम्ही वाटच बघतोय!
Just Now!
X