30 November 2020

News Flash

“जनतेसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट, मंत्र्याच्या गाड्यांवर मात्र वारेमाप खर्च”

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या संकट काळात राज्य शासनाने सरकारी तिजोरीतून राज्यातील अनेक वर्गांना आर्थिक मदत नाकारली, आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे सांगत विकासकामांनाही स्थगिती दिली. मात्र, दुसरीकडे मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रूपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी असा प्रश्न भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

करोना संकट काळात बाराबलुतेदारांचे व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर मिळत नसल्याने त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जाचे अजून वितरण केलेले नाही. करोना योद्धे पोलीस, डॉक्टर, रूग्णसेविका यांचे पगार वेळेवर होत नाहीत. राज्यातील अनेक छोटे उद्योग अडचणीत आहेत, वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना फटका बसलेला असून त्यावर अजुनही तोडगा काढलेला नाही, काटकसरीचे धोरण या गोंडस नावाखाली राज्यातील विकास कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. अशा सर्व समस्या असताना सरकार मात्र मंत्र्यांच्या अलिशान गाड्यावर लाखो रूपये खर्च करीत आहे. याआधी ही राज्य सरकारने शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा गाड्यांची परवानगी दिलेली आहे. तेव्हा सरकारकडे फक्त मंत्र्यासाठी पैसा आहे का? असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार राज्याला निधी देत नाही अशी ओरड केली जायची. मात्र, पीएम केअर फंडाकडून सर्वाधिक निधी हा महाराष्ट्रालाच मिळाला आहे तसेच जीएसटीचा परतावाही आपल्या राज्याला मिळाला आहे. केंद्र सरकारने रब्बी आणि खरीप पिकांच्या खरेदीची मर्यादा आणि मुदतही वारंवार वाढवून दिली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गतही राज्यातील सर्व घटकांना आर्थिक मदत केली. पण राज्य सरकारने मात्र राज्यातील जनतेला कोणत्याही स्वरूपातली आर्थिक मदत अथवा अनुदान दिलेले नाही, असा आरोपही उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 4:00 pm

Web Title: government treasury rattles for the public but big expenditure on ministers vehicles says keshav upadhye aau 85
Next Stories
1 सकारात्मक बातमी : मुंबईची हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं वाटचाल सुरु
2 ४० टक्के मुंबईकरांचा करोना आपोआप गेला का? आशिष शेलारांचा सवाल
3 औषधांच्या नशेचा जोर!
Just Now!
X