राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्तेचा गैरवापर व दबाव तंत्राचा वापर करून फोडफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केल्यानंतर, आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारला ‘बाजी पलटने में देर नहीं लगती’ असे म्हणत इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजपा – सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. सरकारं येत असतात जात असतात, बाजी पलटने में देर नहीं लगती.

शिवाय, भाजपा – शिवसेनेच्या कारकिर्दीत अनेक गंभीर भ्रष्टाचाराची प्रकरणं घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. कारण, परिस्थितीच अशी होईल की त्या भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्व:पक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.