News Flash

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली गेली आहे. 

संग्रहित

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा

तर,  ”संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेचा संताप पाहता, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आता पुढील कार्यवाही सुरू ठेवावी.” असं विधानपरिषद  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे नाही

या अगोदर,  पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी रविवारी जाहीर केले. हा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही राज्यपालांकडे पाठविलेला नाही. त्यामुळे हा राजीनामा कुठे आहे, तो तसबीर करण्यासाठी ठेवला आहे का? असा सवाल करीत भाजपाने विधानसभेत  आक्रमक भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत या मुद्दय़ावर मौन बाळगले होते.

राठोड यांच्या जागेवर सेनेतून कोण मंत्री होणार?

तर, विदर्भातील शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात  मंत्रिपद गमवावे लागल्यावर त्यांच्या जागी या भागातून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 6:21 pm

Web Title: governor approves resignation of forest minister sanjay rathord msr 87
Next Stories
1 “करोना म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरू, म्हणून दरेकरांना करोना नसेल झाला”, अजित पवारांची टोलेबाजी!
2 “जर सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर…”, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक
3 खवय्यांसाठी वाईट बातमी! मनसेच्या इशाऱ्यानंतर कराची बेकरीची मुंबईमधून एक्झिट
Just Now!
X