यशवंतराव चव्हाण पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ विचारवंत, संपादक गोिवदराव तळवलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत ऐकण्याची संधी त्यांच्या चाहत्या वाचकांना मिळणार आहे. उद्या (रविवारी) सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता ‘एबीपी माझा’वर हे प्रसारण होईल. तळवलकर गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत असतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नव्हते. पण त्यांनी आपले मनोगत ध्वनिफितीमार्फत व्यक्त केले होते.
या मनोगतामध्ये तळवलकर यांनी यशवंतरावांच्या जीवनातील काही प्रसंगांचा आढावा घेतला आहे, तसेच स्वातंत्र्योत्तर काळापासूनच्या काही घटनांचा आपल्या पत्रकारितेवर कसा परिणाम झाला त्याचा आणि बदलत्या पत्रकारितेचाही वेध घेतला आहे.