News Flash

आजोबांकडून चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

घरी रहायला आलेल्या चार वर्षांच्या नातीवर आजोबांनीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिवडी येथे उघडकीस आली आहे. रफी अहमद किडवाई मार्ग

| August 19, 2013 03:26 am

घरी रहायला आलेल्या चार वर्षांच्या नातीवर आजोबांनीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिवडी येथे उघडकीस आली आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी या प्रकरणी पिडीत मुलीच्या आजोबांसह त्यांच्या पत्नीलाही अटक केली आहे.
ही मुलगी शिवडी येथे आजोबांच्या घरी रहायला गेली होती. १५ ऑगस्टच्या रात्री घरातील सर्वजण झोपले असताना तिच्या ६५ वर्षीय आजोबांनी तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी तिला त्रास होऊ लागल्याचे तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर मुलीला उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनंतर पोलिसांनी आईचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री त्यानी आजोबांना तसेच या गुन्ह्यात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही अटक केली.
घटना घडल्यानंतर आरोपीच्या पत्नीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिलाही पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीने यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 3:26 am

Web Title: grand father sexually abuses four year girl
Next Stories
1 जयंत साळगावकर रुग्णालयात
2 आता खड्डय़ांच्या ‘प्रक्षेपका’तून दगडांची उड्डाणे!
3 अमेरिकन महिलेवर लोकलमध्ये हल्ला
Just Now!
X