17 July 2019

News Flash

पवार आजोबांनी असा पुरवला नातीचा हट्ट

मुंबईतील कार्यालयात शरद पवार यांना घेण्यासाठी त्यांची नात रेवती आली होती

शरद पवार नात रेवती सुळे समवेत कारने घरी जात असताना अनेकांनी त्यांची छायाचित्रं कॅमेरात कैद केली

आजोबा आणि नात म्हटलं की जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं पाहायला मिळतं. राजकीय नेतेही या गोष्टीसाठी अपवाद नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे जेव्हा मुंबईतील पक्ष कार्यालयात आले तेव्हा त्यांना घ्यायला त्यांची नात रेवती सदानंद सुळे ही होंडा सिटी कारने आली. पक्ष कार्यालयाबाहेर नात आपल्याला घ्यायला आली म्हटल्यावर पवार आजोबा तिच्याच कारमध्ये बसले. कारण नात रेवतीने तसाच आग्रह धरला होता. मग नातीचा हट्ट पवार आजोबा कसा काय मोडतील? शरद पवारांनी त्यांच्या नातीचा हा हट्ट पुरवला ते तिच्यासोबत होंडा सिटी कारमध्ये बसले आणि मग रेवती त्यांना पक्ष कार्यालयातून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि नात रेवती यांच्यासोबत सिल्वर ओक या दक्षिण मुंबईतल्या घरी परतले.

कार्यकर्त्यांसोबत माध्यमांच्या प्रतिनिधींनीही हे खास क्षण कॅमेरात टीपले. आजोबांच्या कारचं सारथ्य नातीने केल्याची दृश्यं अनेकांनी कॅमेरात कैद केली. एरवी पत्रकार परिषद किंवा कोणताही कार्यक्रम संपला की शरद पवार हे त्यांच्या टोयोटा लॅन्ड क्रुझर या गाडीने प्रवास करतात. आज मात्र नातीच्या हट्टापुढे पवार आजोबांचं काहीही चाललं नाही. मागच्याच आठवड्यात शरद पवारांनी त्यांच्या नातवंडांसह कोकण दौरा केला. कृषी आणि उद्योग याची माहिती असावी म्हणून आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन कोकणात गेले होते. आज सुप्रिया सुळेंच्या मुलीने म्हणजेच पवारांच्या नातीने केलेला आग्रह पवारांना मोडता आला नाही. पवार आजोबांनी नातीचा हट्ट पुरवत तिच्यासोबत कारमध्ये बसूनच घरी परतणे पसंत केले.

First Published on December 7, 2018 8:07 pm

Web Title: granddaughter revati sule and sharad pawar went together in car