‘रुणवाल ग्रीन’मध्ये गप्पांचा फड रंगला; इतर गृहसंस्थांनी कित्ता गिरविण्याचे सहकार विभागाकडून आवाहन

संदीप आचार्य, लोकसत्ता

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
nmmc chief dr kailas shinde visit municipal corporation hospitals in vashi
औषधचिठ्ठी न देण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करा; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

मुंबई : करोना व टाळेबंदीमुळे टोलेजंग टॉवरपासून चाळ, वस्त्यांमध्ये लाखो लोक अडकून पडले आहेत. यात सर्वाधिक हाल होत आहेत ते घरातील वृद्ध मंडळी आणि बाळगोपाळांचे.. या मंडळींना फिरायला जाता येत नाही की खेळायला.. पण ही अडचण भांडुपच्या रुणवाल सोसायटीला बिलकूल नाही. इथल्या ९३ वर्षांच्या सावंत आज्जी असोत, की १० वर्षांचा रोहन असो.. ही मंडळी मजेत आहेत. कारण ही मंडळी सोसायटीतील आपल्या वयाच्या मंडळींबरोबर ‘झूम’वर कधी गप्पा मारण्यात रंगलेली असतात तर कधी गाण्याच्या भेंडय़ांमध्ये.. खेळाचे वेगवेगळे प्रकार शोधून ही मंडळी टाळेबंदीतही आनंद शोधत असतात, तेही आपले वय विसरून..

‘रुणवाल ग्रीन’ सदाबहार म्हणूनच ओळखली जाते. येथील आठ टॉवरमध्ये जवळपास दहा हजारांहून अधिक लोक राहतात. सरकारने टाळेबंदी जाहीर करताक्षणी एवढय़ा प्रचंड आकाराच्या आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी टाळेबंदी पूर्ण ताकदीने पाळण्याचा निर्णय घेतला. सोसायटीत करोनाचा मुकाबला अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या पद्धतीने केला जात आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्या कल्पकतेने  वापर करण्यात येत आहे याची दखल खुद्द सहकार विभागाने घेत मुंबईतील सर्व मोठय़ा सोसायटय़ांना ‘रुणवाल ग्रीन पॅटर्न’ राबविण्यास सांगितले आहे.

आज या सोसायटीमधील एकही व्यक्ती विनाकारण घरातून बाहेर पडत नाही. किंबहुना तशी व्यवस्थाच सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी के ली आहे. सोसायटीने ‘आर— अ‍ॅसेस’ नावाचे मोबाइल अ‍ॅप बनविले असून त्याद्वारे रहिवाशांना सोसायटीबाहेर जाण्यासाठी ऑनलाइन पास दिला जातो. प्रत्येक इमारतीत आठ अ‍ॅडमिन नेमण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून ही परवानगी दिली जाते. सोसायटीतील सुरक्षा रक्षक मंजुरी असलेल्या पासधारकांनाच आत व बाहेर जाऊ देत असल्यामुळे प्रतिबंध बसतो. महत्त्वाचे म्हणजे एवढय़ा मोठय़ा सोसायटीतील लोकांसाठी लागणारी फळे व भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून मागविण्यात येत आहे. सदस्यांच्या मागणीनुसार बास्केट तयार करून सुरक्षा रक्षकांमार्फत घरोघरी पोहोचवली जातात. अशाच प्रकारे धान्य आदी सामान बिग बाजार, बिग बास्केट डेली, ग्रोफर आदी ऑनलाइन पुरवठादारांबरोबर चर्चा करून घरपोच के ली जातात.

सोसायटीतील जयेश तिलवानी, शिरीष भोईटे, नेहा जोशी, हिमांशू ठक्कर, अजय पिल्लई, कृष्णन आदी अनेक जणांचे योगदान असल्याचे ‘रुणवाल ग्रीन रेसिडेंट असोसिएशन’चे अध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले. सोसायटीतील सर्वच रहिवाशांच्या सहकार्यामुळेच शिस्तबद्ध पद्धतीने टाळेबंदी तर पाळत आहोत, पण सोसायटीतील आबालवृद्धांनाही तंत्रज्ञानाचा वापर करून वेगळ्या प्रकारे आनंद मिळवून देत आहोत. व्हिडीओ कॉल तसेच झूमच्या माध्यमातून येथील वृद्ध मंडळी एकमेकांशी संपर्क साधून मनमुराद गप्पा मारतात. करोनाच्या लढाईतही गप्पा व ऑनलाइन खेळ खेळताना संध्या, छाया मला भिववू शकत नाही, असे नव्वदी पार केलेल्या सावंत आजी सहज सांगून जातात.