मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिके च्या रुग्णालयांमधील खाटा वितरणाबाबत दररोज सकाळी आढावा घेण्यात यावा. तसेच कोणी खाटा उपलब्ध करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल तर त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधितांना दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील कोविड आरक्षित रुग्णशय्यांची अनधिकृतपणे विक्री होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाले होते, त्याची गंभीर दखल घेत खाटा वितरणाबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी सर्व संबंधित अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत व त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्ड वर उपलब्ध असून ही नियमितपणे अद्ययावत होत असते, अशी माहिती पालिके च्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिके ने के ले असून अनधिकृतपणे कोणी खाटांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना किंवा महापालिके च्या नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.