पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याची चौकशी करण्यास विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने सीबीआयला मंगळवारी परवानगी दिली. त्यामुळे २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत तिहार कारागृहात जाऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चौकशी करता येणार आहे.

मंगळवारी राजनला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्यायाधीश ए. एल. पानसरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. डे हत्या प्रकरणातील घडामोडींबाबतचा खुलासा करण्याच्या हेतूने राजनच्या चौकशीची गरज आहे. त्यामुळे राजनच्या चौकशीची परवानगी द्यावी, अशी विनंती सीबीआयतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला आरोपपत्राची प्रत नुकतीच उपलब्ध झालेली आहे.