News Flash

LIVE : ‘ग्रीस’चे काय होणार? – गिरीश कुबेर यांना प्रश्न विचारण्यासाठी येथे क्लिक करा

'लोकसत्ता'चे संपादक आणि अर्थतज्ज्ञ गिरीश कुबेर लाइव्ह 'फेसबुक चॅट'च्या माध्यमातून 'ग्रीस'संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

| July 7, 2015 08:55 am

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडण्यात अपयश आल्याने ग्रीसवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. ग्रीसने आर्थिक सुधारणांची मागणी फेटाळून लावली तर २० जुलैला होणाऱ्या युरोझोनच्या बैठकीत हा देश दिवाळखोर जाहीर केला जाईल. शिवाय युरोझोनमधूनही बाहेर फेकला जाईल. त्यामुळे दिवाळखोरीत निघणारा २१ व्या शतकातील तो पहिलाच देश ठरेल. दरम्यान, रविवारी ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधातही मतदान केले आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांच्या यादीत आघाडीवर असलेल्या भारतावर या संकटाचा परिणाम होणार का? झाला तर तो किती आणि कसा? भारतीय शेअर बाजार त्यामुळे खरंच कोसळेल का? भारतीय कंपन्यांच्या उत्पन्नात आणि वाढीवर त्याचा परिणाम होईल? हे असे अनेक प्रश्न लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करणा-या तरूण विद्यार्थ्यांना याबाबत विशेष कुतूहल आहे. त्यामुळे हा विषय नेमका काय आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हे अतिशय सोप्या शब्दांत समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता’ तुम्हाला देत आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक आणि अर्थतज्ज्ञ गिरीश कुबेर लाइव्ह ‘फेसबुक चॅट’च्या माध्यमातून ‘ग्रीस’संबंधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

कधी : मंगळवार, ७ जुलै २०१५
कुठे : लोकसत्ता फेसबुक पेज (www.facebook.com/LoksattaLive)
किती वाजता :  दुपारी ३ ते ४ या वेळेत.

प्रश्न कसा आणि कुठे विचाराल?
* दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर (www.facebook.com/LoksattaLive) लाइव्ह चॅटची इमेज अपलोड केली जाईल. त्या इमेजच्या खाली तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे. गिरीश कुबेर तुमच्या प्रश्नाला तेथेच उत्तर देतील.
* तुम्ही तुमचे प्रश्न ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजच्या ‘इनबॉक्स’मध्येही पाठवू शकता.

गिरीश कुबेर यांना प्रश्न विचारण्यासाठी येथे क्लिक करा.

greece_LSFBchat_news

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 8:55 am

Web Title: greece debt crisis live facebook chat with girish kuber
टॅग : Girish Kuber,Greece
Next Stories
1 विदर्भातील पराभवाने मुख्यमंत्र्यांना फटका
2 राज्यासाठी एकच तंत्रशिक्षण विद्यापीठ
3 सायन-पनवेल रस्त्याच्या कामात ठेकेदाराचे हितरक्षण?
Just Now!
X