वाहतूक कोंडीत न अडकता थेट प्रवास

मुंबई : स्वयंघोषित पास योजनेत लाल रंगातील आरोग्य सेवेशी संबंधित वाहनांना प्राधान्य देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून ठिकठिकाणी विशेष मार्गिके ची व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) केली आहे. टोल नाके  किं वा नाकाबंदीदरम्यान ही वाहने खोळंबू नयेत यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र मार्गिका आरक्षित के ली होती. तर काही ठिकाणी विरुद्ध दिशेच्या मार्गिके वरूनही वाहने सोडण्यात आली.

मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन रंगांच्या स्वयंघोषित पासपैकी लाल रंगातील वाहनांची वाहतूक विनाअडथळा व्हावी यासाठी प्राधान्याने उपाययोजना के ल्या जात आहेत. शहरात ठिकठिकाणी तेथील वाहतुकीचे प्रमाण, उपलब्ध जागेनुसार लाल रंगातील वाहने सुरळीत पुढे सरकू  शकतील या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली होती. उदाहरणार्थ, सकाळी दक्षिणमुखी म्हणजे मुंबईत येणारी तर संध्याकाळी उत्तरमुखी  मुंबईतून बाहेर पडणारी किं वा उत्तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणारी) वाहने जास्त असतात. हे लक्षात घेऊन सकाळी उत्तरमुखी मार्गिके वरून मुंबईच्या दिशेने लाल रंगातील वाहने जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

मुलुंड, दहिसर, मानखुर्द येथील पाच टोल नाक्यांवर वाहनांची झाडाझडती सुरू आहे. तसेच निर्बंध संपेपर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी नाकाबंदी ठेवण्यात येणार आहे.

मात्र येथेही ‘कलर कोड’नुसार वाहनांना मोकळा रस्ता मिळावा, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लाल रंगासह पिवळ्या व हिरव्या रंगाचे वर्तुळाकार कागद चिकटवलेली वाहने मार्गिकेच्या मोकळय़ा भागातून सोडण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही वाहने विनाकारण रस्त्यावर उतरल्याचे आढळले. तर काही चालक, मालकांनी अत्यावश्यक सेवेशी संबंध नसताना वाहनावर रंगीत कागद चिकटवल्याचेही आढळले. या वाहनांवर कारवाई के ली गेली.

‘स्वयंघोषित पास योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कारवाईऐवजी वाहनचालक, मालकाची समजूत काढण्यावर भर असेल. मात्र काही दिवसांनी असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई के ली जाईल,’ असे पोलीस दलाचे प्रवक्ते चैतन्य एस. यांनी सांगितले.

ठाण्याच्या वेशीवर वाहनांची तपासणी ; मुलुंड टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

ठाणे : मुंबई शहरात अत्यावश्यक सेवांशी निगडित वाहने वाहतूक कोंडीमध्ये खोळंबू नयेत यासाठी या वाहनांना लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे स्टीकर चिटकविण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर सोमवारी सकाळपासून मुंबई पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली होती. मात्र, या तपासणीमुळे मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १० मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी वाहनचालकांना अर्धा तास लागत होता.  पहिल्या दिवशी मुंबई पोलिसांनी या टोलनाक्यावर कारवाई केली नसली तरी स्टिकर नसलेल्या वाहनचालकांना समज दिली जात होती. मात्र, यामुळे वाहनांच्या मुलुंड टोलनाका परिसरात रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ वाजेनंतरही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे ठाणे, नाशिकहून मुंबईत जाणाऱ्यांना अडकून राहावे लागले. वाहतूक कोंडीमुळे अत्यावश्यक सेवेतील अनेकांना वेळेवर पोहचता येणे शक्य झाले नाही. १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा तास लागत होता.