महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकसत्ता प्रस्तुत

घरगुती कचऱ्याची (ओला व सुका कचरा आणि ई-कचरा)शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था/संकुलांसाठी एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा-२०१७’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेत मुंबई (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पालघर, मिरा-भाईंदर, उल्हासनगर आणि पनवेल महापालिका क्षेत्र) तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांमधील सहकारी गृहनिर्माण संस्था व संकुलांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी एकूण दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत.  इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ३० मे २०१७ पर्यंत mpcbnewyear@gmail.com या ई-मेलवर किंवा ‘लोकसत्ता’ कार्यालय,   ‘लोकसत्ता’ ब्रँड विभाग, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१ येथे पाठवायच्या आहेत. स्पर्धेविषयक अधिक माहिती http://mpcb.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.

ग्रीन सिटी व स्वच्छ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.