25 April 2019

News Flash

कचरामुक्त परिसर मोहिमेला ‘लोकसत्ता’चे प्रोत्साहन

ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८

ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८

कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत असताना, या प्रश्नावर सरकारी आणि संस्थात्मक पुढाकाराइतकीच नागरिकांच्या सहभागाची गरजही अधोरेखित होऊ लागली आहे.

याचाच एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ घेऊन येत आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८’. गृहनिर्माण सोसायटय़ा, संकुले, शैक्षणिक संस्थांसाठी असलेल्या या स्पर्धेत कचरा विल्हेवाट आणि व्यवस्थापन किती योग्य आणि अभिनव पद्धतीने केले जाते, त्यातून परिसराला कोणता लाभ झाला किंवा होत आहे हे तपासले जाणार आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पालघर; तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नाशिक या शहरांतील गृहनिर्माण आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी होता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १० लाखांपेक्षा अधिक रकमेची पारितोषिके प्रदान केली जातील.

आपली संस्था/सोसायटी चौकटीत दिलेल्यांपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करत असल्यास आपण ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८’ साठी पात्र ठरू शकता. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत mpcbgreensociety@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावा. याशिवाय ‘लोकसत्ता ब्रँड विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१’ या पत्त्यावरही प्रवेशिका पाठवता येतील. अधिक माहितीसाठी आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी http://mpcb.gov.in वर ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८’ यावर क्लिक करा.

काय अपेक्षित?

  • कचरा कमी करणे
  • ओला, सुका आणि घातक व ई-कचऱ्याचे विलगीकरण
  • कचरा प्रक्रिया
  • कचरा पुनर्वापर पद्धती
  • कचरामुक्ती
  • बायोगॅस निर्मिती
  • थर्माकोल व प्लास्टिकमुक्ती
  • कंपोस्ट निर्मिती

 

First Published on September 9, 2018 12:47 am

Web Title: green society innovative resolution competition 2018