पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अॅड निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली. त्यानंतर अॅड निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीस अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आणखी वाचा- ‘टूलकिट’चं बीड कनेक्शन; शंतनू मुळूक यांच्या घराची झाडाझडती; कुटुंबीयांचीही चौकशी
शंतनू यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. तर निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांना काल (१६ फेब्रुवारी) खंठपीठाने अंतरिम जामीन दिला होता. तर निकिता यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिला.
आणखी वाचा- देशात ज्या २१ वर्षाच्या मुलीची चर्चा आहे, ती दिशा रवी कोण आहे?
Bombay High Court allows transit anticipatory bail application of Nikita Jacob, grants her transit bail for 3 weeks in connection with FIR by Delhi police in Toolkit matter.
In case of arrest, she will be released on a personal bond of Rs 25,000 and one surety of like amount. pic.twitter.com/2yZBhEPaYP
— ANI (@ANI) February 17, 2021
आणखी वाचा- टूलकिट प्रकरण : दिल्ली पोलिसांनी Zoom कडे मागितली ‘त्या’ मिटिंगची सविस्तर माहिती
दिल्ली पोलीस न्यायालयात काय म्हणाले?
थनबर्ग हिचे ‘टूलकिट’ या प्रकरणी अटकेत असलेली पर्यावरणवादी दिशा रवी आणि जेकबसह खलिस्तानी चळवळीत सहभागी असलेल्यांनी तयार केले व समाजमाध्यमावरून ते प्रसारित केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी काल झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:36 pm