News Flash

मुंबई विमानतळावर विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू

या विचित्र अपघातात संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे.

मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. एअर इंडियाचे मुंबई-हैदराबाद हे विमान रात्री पावणेनऊच्या सुमारास २८ क्रमाकांच्या धावपट्टीवरून उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी विमानतळावरील ग्राऊंड स्टाफपैकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकजण विमानाच्या इंजिनाच्या पंख्याजवळ तांत्रिक गोष्टींची तपासणी करत होता. मात्र, अचानकपणे पंख्यांच्या सक्शन पॉवरमुळे हा कर्मचारी आत खेचला गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातात संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळे त्याची ओळख पटवणे अद्यापपर्यंत शक्य झालेले नाही. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 10:27 pm

Web Title: ground staff died due to stuck in air india plane engine fan on mumbai airport
टॅग : Mishap
Next Stories
1 … तर स्मार्ट सिटीला आमचा विरोधच राहिल – उद्धव ठाकरेंचा इशारा
2 घाटकोपर मेट्रो स्थानकात तरुणीची आत्महत्या
3 माहितीसाठी हेलपाटे घालायला लावणाऱ्या पालिका अभियंत्याला दंड
Just Now!
X