04 March 2021

News Flash

नेपाळमधील मुलींना विकणाऱ्या टोळीला अटक

नेपाळमधून मुलींना फूस लावून नवी मुंबईत आणून त्यांना देहविक्रीसाठी विकणाऱ्या एका टोळीला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रूपेश तमंग, सचिन तमंग, राहुल थापा, प्रेम

| May 10, 2013 03:53 am

नेपाळमधून मुलींना फूस लावून नवी मुंबईत आणून त्यांना देहविक्रीसाठी विकणाऱ्या एका टोळीला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रूपेश तमंग, सचिन तमंग, राहुल थापा, प्रेम तमंग अशी या नेपाळवासीयांची नावे आहेत. रेस्क्यू फाऊंडेशन आणि पोलिसांनी तुर्भे येथील रेडलाइट एरियातून २० वर्षीय पीडित मुलीला पोलिसांनी सध्या बोईसर येथील महिला आश्रमात ठेवले आहे.
नेपाळ राज्यातील काठमांडू येथील मकवानपूर जिल्ह्याजवळील नामतर गावामधून पीडित मुलीला रूपेश तमंग याने  प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष दाखवून तुर्भे येथील रेडलाइट एरियात आणून ३५ हजार रुपयांना विकले. रूपेश पुणे येथील आळंदी रोडवरील एका चायनीज गाडीवर काम करीत होता. तुर्भे येथे त्याचा भाऊ सचिन  राहतो, असे त्याने पीडित मुलीला सांगितले. तुर्भे पोलिसांना त्याची खबर लागल्यांतर रेस्क्यू फाऊंडेशन कार्यर्त्यांच्या मदतीने सचिनच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि त्या मुलीची सुटका करण्यात आली. या टोळीने पुणे, नवी मुंबईत अशा प्रकारे अनेक मुलींना विकल्याचा संशय व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 3:53 am

Web Title: group of trafficking of nepali girls for prosecution arrested
Next Stories
1 जकात दलालांच्या धमकीचे पडसाद विधी समितीतही
2 कंपनीची बस उलटून कर्मचारी ठार
3 आयकर भवनास आग
Just Now!
X