03 March 2021

News Flash

खोताच्या वाडीत श्रमदानाची ‘गुढी’

पालिका आणि रहिवाशांच्या माध्यमातून होणारे श्रमदान मुंबईकरांसाठी एक आदर्श ठरणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पाडव्याच्या पूर्वसंध्येला पालिका व रहिवाशांकडून स्वच्छता

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मुंबईमधील देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षणस्थान बनलेल्या आणि पुरातन वारसा वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोताच्या वाडीतील गल्लीबोळात श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाई मोहीम राबविण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने सोडला आहे. पालिकेच्या या श्रमदानामध्ये खोताच्या वाडीतील रहिवाशांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. पालिका आणि रहिवाशांच्या माध्यमातून होणारे श्रमदान मुंबईकरांसाठी एक आदर्श ठरणार आहे.

दर वर्षी गणेशोत्सव, दिवाळी जवळ आल्यानंतर घरोघरी साफसफाई करण्यात येते. घरातील भंगार साहित्य, जळमट काढून घर लख्ख करून उत्सवासाठी घर सजवले जाते. त्याच धर्तीवर पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने गिरगाव परिसरातील पोर्तुगालकालीन छोटय़ा-मोठय़ा आकर्षक अशा टुमदार बंगल्यांमुळे पुरातन वारसा वास्तू म्हणून दर्जा मिळालेल्या खोताच्या वाडीची गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला श्रमदानातून साफसफाई करण्याचा संकल्प सोडला आहे.

या संदर्भात ‘डी’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी खोताच्या वाडीमधील रहिवाशांबरोबर चर्चाही केली. चर्चेदरम्यान रहिवाशांनीही या श्रमदानात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या रविवारी गुढीपाडवा असून शनिवारी सकाळपासून खोताच्या वाडीच्या साफसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. श्रमदानातून परिसर स्वच्छ करण्याची ही सुरुवात आहे. भविष्यात उत्सव जवळ आल्यानंतर रहिवाशांच्या मागणीनुसार निरनिराळ्या भागात श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करता येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. पुरातन वारसा वास्तू असलेल्या खोताच्या वाडीत पाडव्याच्या पूर्वसंध्येला रहिवाशांच्या सहकार्याने पालिकेमार्फत होणारे श्रमदान मुंबईकर आणि स्वच्छ भारत अभियानात एक आदर्श ठरणार आहे.

उत्सव जवळ आल्यानंतर घराची साफसफाई केली. घर स्वच्छ करुन उत्सवाचे स्वगत केले जाते. घराच्या आसपासचा परिसर हा घराचाच एक भाग मानणे गरजेचे आहे. घराप्रमणेच आसपासचा  परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने खोताच्या वाडीची सफाई मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रहिवाशांकडूनही या मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे हे विशेष.

विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘डीविभाग कार्यालय

काही ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकण्यात येतो. तेथेच लहान मुले खेळत असतात. त्यातच आता पावसाळा जवळ येत असून साचणाऱ्या कचऱ्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पालिकेच्या सहकार्याने खोताच्या वाडीत श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाई करण्यात येणार आहे. रहिवाशांनी पालिकेच्या श्रमदानात सहभागी होऊन खोताची वाडी लख्ख करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाकर भटकळ, रहिवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 3:16 am

Web Title: gudi padwa 2018 in khotachi wadi
Next Stories
1 मुंबईत लोकल ट्रेन्समधून दररोज १०० मोबाइल जातात चोरीला
2 सफाई कर्मचारी परीक्षेतील प्रश्नांबाबत चौकशीचे निर्देश
3 सुसाट गाडीत बसलेल्यांना मागची धूळ दिसत नाही!
Just Now!
X