‘लोकसत्ता अर्थभान’मध्ये शुक्रवारी बोरिवलीकरांना मार्गदर्शन
तेजीकडे पुन्हा झेपावलेले भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक, स्थिर उत्पन्न देणाऱ्या पर्यायांवरील काही प्रमाणातील वाढीव व्याजदर तसेच कमी होणारे खनिज तेलाच्या किंमती आणि अमेरिकी डॉलरसमोर भक्कम होणारा रुपया या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचे भान जाणवून देणारा अर्थसाक्षरतेचा उपक्रम पुन्हा एकदा ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी सादर करण्यात येत आहे.
‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ हा गुंतवणूकपर मार्गदर्शन कार्यक्रम येत्या शुक्रवार, ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता होत आहे. सेंट अॅम्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरीवली (पश्चिम) येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सद्य अर्थस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीबाबतचे नियोजन कसे असावे याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत. यावेळी उपस्थितांना गुंतवणूकविषयक शंकांचे समाधान उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारून करून घेता येणार आहे.
‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयावर सनदी लेखापाल तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय समोर असताना कोणत्या पर्यायाला किती महत्त्व द्यावे याबाबतचा निर्णय सुलभतेच्या दृष्टीने त्या मार्गदर्शन करतील. तर ‘म्युच्युअल फंड : गुंतवणूक फायद्याची’ यावर अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे आपले विचार मांडतील. भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड यांचा संबंध विशद करताना फंडांचे प्रकार, त्यातील गुंतवणूक व परतावा तसेच करमात्रा यावरही ते यावेळी प्रकाश टाकतील.
वक्ते
तृप्ती राणे
अर्थनियोजनाचा श्रीगणेशा
कौस्तुभ जोशी
म्युच्युअल फंड : गुंतवणूक फायद्याची
* कधी? : शुक्रवार ३० नोव्हेंबर, सायं.५.४५ वाजता
* कुठे? : अॅम्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ, बोरिवली (पश्चिम)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 1:51 am