ताणाचे व्यवस्थापन, रोजगार संधी, करोनोत्तर काळातील विशेष वाव असलेल्या पदवीपूर्व शिक्षणाबाबत तज्ज्ञांचा सल्ला

करोनाकाळात विविध क्षेत्रांत अनेक बदल झाले.  शिक्षण क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला. या सगळ्या बदलांना समजून घेत करिअरची निवड कशी करावी, हा प्रश्न पालक-पाल्यांपुढे आहे.  दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना गोंधळ होतो; पण करोनाने तो आणखीनच गुंतागुंतीचा केला आहे. यातून मार्ग काढायचा तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. ‘लोकसत्ता – मार्ग यशाचा’ या वेबसंवाद मालिके तून ते देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आजपासून या वेबसंवादाला सुरुवात होत आहे.

टाळेबंदीदरम्यान घरात असताना  मन:स्वास्थ्य चांगले राखणे, हे  गरजेचे होते. त्यासंबंधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पदवी मिळाल्यावर नोकरी असे एक गणित असते; पण यासाठी पदव्युत्तर शिक्षणाची दिशा कशी ठरवावी, नोकरीयोग्य कौशल्ये कशी अंगीकारावी, हे सांगणार आहेत, करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत.  दहावी-बारावीनंतर शिक्षण घेताना कोणत्या क्षेत्रांना वाव असेल, कु ठे संधी असतील याविषयी मार्गदर्शन करतील, करिअर समुपदेशक विवेक वेलणकर. ‘लोकसत्ता – मार्ग यशाचा’ हा वेबसंवाद १७, १९ आणि २० सप्टेंबरला होणार असून, या संवादात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येणार आहे.

विषय

* १७ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता – करिअरची निवड आणि ताणाचे व्यवस्थापन – डॉ. हरीश शेट्टी

* १९ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता – नोकरी आणि रोजगारसंधींसाठी आवश्यक कौशल्ये आणि पदव्युत्तर शिक्षणाची दिशा – डॉ. श्रीराम गीत

* २० सप्टेंबर, सकाळी ११ वाजता – करोनोत्तर काळातील विशेष वाव असलेल्या पदवीपूर्व शिक्षणसंधींचा आढावा – विवेक वेलणकर

https://tiny.cc/Loksatta_MargYashacha  या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

* नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल.

* त्याद्वारे कार्यक्रमाच्या दिवशी दिलेल्या वेळेत या संवादात आपल्याला सहभागी होता येईल.

* अधिक माहितीसाठी  https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.