आजच्या माहितीविश्वात विद्यार्थ्यांना करिअरच्या निरनिराळ्या वाटा कोणत्या हे वेगळे सांगायची गरज नाही, पण आपल्यासाठी योग्य करिअर मार्ग कोणता, हे  समजावून देण्यासाठी मात्र मार्गदर्शकाची गरज लागतेच.

सध्याच्या करोना काळात विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा आणि करिअरनिवड यांची सर्वाधिक चिंता आहे. करियरच्या अगणित पर्यायांतून नेमका आपल्यायोग्य पर्याय कसा निवडावा, यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी  ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या वेबसंवादाद्वारे  मार्गदर्शन केले जाणार आहे. १७, १९ आणि २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या या उपक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, करिअर समुपदेशक विवेक वेलणकर आणि ‘लोकसत्ता करिअर वृत्तांत’मधील ‘करिअर मंत्र’ हे सदर लिहिणारे करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत विद्यार्थी, पालकांशी संवाद साधतील. विविध करियर वाटांबद्दल असणाऱ्या शंकांचे निरसन या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना करता येईल.

विषय..

* १७ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता – करिअर निवड आणि ताणाचे व्यवस्थापन – डॉ. हरीश शेट्टी

* १९ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता – नोकरी आणि रोजगारसंधींसाठी आवश्यक कौशल्ये आणि पदव्युत्तर शिक्षणाची दिशा – डॉ. श्रीराम गीत

* २० सप्टेंबर, सकाळी ११ वाजता – करोनोत्तर काळातील विशेष वाव असलेल्या पदवीपूर्व शिक्षणसंधींचा आढावा – विवेक वेलणकर

सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक

https://tiny.cc/Loksatta_MargYashacha