शहरातील उपाहारगृहांसाठी अग्निशमन दलाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून प्रामुख्याने अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुलभ आणि कालसुसंगत करण्यात आली आहे. याशिवाय उपाहारगृहात किती गॅस सिलिंडर असावेत, ते कसे ठेवावेत याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. अग्निसुरक्षेविषयक केलेल्या उपाययोजनांची ठळक माहिती उपाहारगृहाच्या मालकाला प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्याची सक्तीचे केले आहे.
कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ आग दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी शहराती उपाहारगृहांच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 29, 2015 12:48 am