गुजरात येथील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेले राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया आणि संगमरवराचे व्यावसायिक विमल पटणी अशा दोघांना सबळ पुराव्याअभावी विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी प्रकरणातून दोषमुक्त केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यानंतर या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आलेले कटारिया हे दुसरे मोठे राजकीय नेते आहेत.
या दोघांविरुद्ध खटला चालवता येईल असे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एम. बी. गोसावी यांनी कटारिया आणि पटनी यांना प्रकरणातून दोषमुक्त केले.