मुंबई : ‘टी सिरीज’चे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला आरोपी अब्दुल राशिद र्मचट याने बुधवारी सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली.

सत्र न्यायालयाने १९ वर्षांपूर्वी राशिदची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा हा निर्णय रद्द करत त्याला गुलशन कुमार यांची हत्या करणे आणि त्यांच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाअंतर्गत दोषी ठरवले होते. तसेच जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. निकाल सुनावताना न्यायालयाने त्याला तातडीने शरणागती पत्करण्याचे आदेशही दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार राशिद याने बुधवारी सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने राशिदचा भाऊ अब्दुल रौफ र्मचट याची जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती.