मेहता पब्लिशिंग हाऊसकडून १०० संस्मरणीय गीतेपुस्तक मागे

‘दिल ढुंढता है फिर वही’, मुसाफिर हू यारों’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘मेरा कुछ सामान’ अशा एकापेक्षा एक सकस आणि अविट गोडीची गाणी देणाऱ्या ‘गुलजार’ गीतांना सुमार अनुवादाचा फटका बसला आहे. प्रतिभावान कवी व गीतकार गुलजार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या निवडक शंभर गाण्यांचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘१०० संस्मरणीय गीते’ या नावाने प्रकाशित केला होता. मात्र ‘शब्दांतरा’च्या या पोरकट प्रकारानंतर गुलजारप्रेमी काव्यरसिकांमध्ये तीव्र संताप उमटताच ‘मेहता’ने हे पुस्तक मागे घेतले आहे.

juna furniture team exclusive interview at loksatta digital adda
Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपट गीतांचा इतिहास गुलजार यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हळुवार प्रेमगीत, गझल ते उडत्या चालीच्या गाण्यांपर्यंत विविध शैलीतील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. त्यांच्या गाण्यांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. गुलजार यांच्या काही निवडक व संस्मरणीय अशा शंभर गाण्यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला. ‘प्रभात’ चित्रपट कंपनीत कवी-गीतकार म्हणून नोकरी करणारे आणि ‘संत तुकाराम’ चित्रपटातील ‘आधी बीज एकले’ हा अभंग लिहिणारे शांताराम आठवले यांचे सुपुत्र सुदर्शन आठवले यांनी हा अनुवाद केला आहे. मात्र हा अनुवाद म्हणजे कवितेच्या प्रांतापासून कोसो दूर असलेले रुक्ष आणि शब्दश: मराठी भाषांतर असून अत्यंत सुमार आणि अयोग्य असल्याच्या तक्रारी मेहता पब्लिशिंग हाऊसकडे गेल्या होत्या. ‘गुलजार’ गीतांची अशी ‘वाट’लागल्यामुळे चोखंदळ वाचक आणि गुलजारप्रेमींनी आपली तीव्र नाराजी मेहता पब्लििशग हाऊसचे सुनील मेहता यांच्याकडे व्यक्त केली होती.

वाचकांच्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेऊन मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक मागे घेऊन झालेली चूक सुधारण्याचे ठरविले. अनुवादाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये आणि वाचकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासालाही तडा जाऊ नये म्हणून पुस्तक मागे घेण्याचा निर्णय प्रकाशनातर्फे घेण्यात आला आहे. ज्या वाचकांना हे पुस्तक परत करायचे असेल त्यांनी ते जिथून विकत घेतले आहे त्या विक्रेत्याला परत देऊन टाकावे.

पुस्तकासाठी त्यांनी दिलेली रक्कमही त्यांना परत करण्यात येणार असल्याचे प्रकाशनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आमची बांधिलकी वाचकांशी

आमची बांधिलकी वाचकांशी आहे. चांगले व दर्जेदार साहित्य वाचकांना आम्ही आजवर देत आलो आहोत. अनुवादाच्या क्षेत्रातही आमचे चांगले नाव आहे. ‘गुलजार’ गीतांच्या या अनुवादामुळे प्रकाशन संस्था तसेच गुलजार यांच्या नावालाही कमीपणा येऊ नये म्हणून पुस्तक मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता पुन्हा एकदा या ‘गुलजार’ गीतांचा अन्य व्यक्तीकडून अनुवाद करून घेण्यात येऊन ते पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाईल.

-सुनील मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस