30 October 2020

News Flash

मुंबईच्या गोवंडीमध्ये गोळीबाराचा थरार, दोन जखमी

4 ते 5 जणांनी गोळीबार केल्याची माहिती

(सांकेतिक छायाचित्र)

मुंबईच्या गोवंडी परिसरात आज(दि.27) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. संपत्तीच्या वादातून ही घटना झाल्याची माहिती मिळत आहे. 4 ते 5 जणांनी हा गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये  2 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान एका हल्लेखोराला देवनार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गोवंडीच्या बैगणवाडी सिग्नलजवळ असलेल्या आशा हॉलसमोर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या हल्लेखोरांपैकी एकाला जागेवरच पकडण्यात आले असून इतर हल्लेखोर पळून गेले आहेत.  या प्रकरणी देवनार पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 9:00 am

Web Title: gun fire in mumbai govandi
Next Stories
1 शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा चाचपणी
2 विद्यापीठाचे बी.कॉम.चे निकाल जाहीर
3 साखरेच्या बाजारपेठेत उत्तर प्रदेशची महाराष्ट्रावर मात
Just Now!
X