News Flash

समीर देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश!

शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महापालिकेतील सत्ता असल्यामुळे मुंबई महापालिकेतून सेनेची सत्ता उखडण्याचे काम मुंबई भाजपने हाती घेतले आहे.

| November 17, 2014 02:04 am

शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महापालिकेतील सत्ता असल्यामुळे मुंबई महापालिकेतून सेनेची सत्ता उखडण्याचे काम मुंबई भाजपने हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते व माजी नगरसेवक समीर देसाई यांना रविवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचे नातेवाईक असून मुंबई भाजपच्या सचिवपदी त्यांची तात्काळ नियुक्तीही करण्यात आली.
मुंबईतील शिवसेनेची ताकद असलेल्या प्रत्येक विभागातून भाजपमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन सेनेच्या ताकदीचे खच्चीकरण करण्याची योजना भाजपने आखली आहे. गोरेगावमध्ये सेनेचे माजी आमदार व नेते सुभाष देसाई यांचा भाजपने पराभव केल्यानंतर गोरेगावमध्ये राहणारे समीर देसाई यांना रविवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी राज्यमंत्री विद्या ठाकूर, नगरसेवक दिलीप पटेल यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये दहा वर्षे कार्यरत असलेले देसाई हे काँग्रेसच्या तिकीटावर दोनवेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 2:04 am

Web Title: gurudas kamat nephew samir desai joins bjp
Next Stories
1 बाळासाहेबांच्या स्मृतिदिनास भाजप नेते जाणार?
2 पराभवाचे चिंतन ; भाजपला पाठिंब्यावरून चर्चा
3 मनसेचे बिल्डरांविरोधात मुंबईत आंदोलन!
Just Now!
X