News Flash

राज्यात पुन्हा गारपीट?

राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा गारपीट?

बुधवार, गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भावर सावट

राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या इतर भागांत हवा कोरडी राहील.

काही आठवडय़ांपूर्वी विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झालेच, शिवाय काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्यानंतरही अधूनमधून गारपिटीचे इशारे मिळत असल्यामुळे राज्यातील विशाल भूभागातील शेतकरी भयग्रस्त आहेत.

रविवारी राज्यभरातील हवा कोरडी होती.  पुढील दोन दिवसही हवेमध्ये फारसा फरक पडणार नाही. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तसेच समुद्रावरून बाष्पयुक्त वारेही येण्याची शक्यता असल्याने बुधवारी मध्य प्रदेश तसेच नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर अशा राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रासोबतच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ांमधील हवा मात्र कोरडी असेल. या गारपिटीमुळे कमाल तापमानात काही अंश से.ची घट होईल.

हिवाळा व उन्हाळा ऋतूच्या स्थित्यंतरात राज्यातील अनेक भागांत गारपीट होते. या वेळी १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले.

बनावट बियाणे चौकशीसाठी एसआयटी

पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्याकडे नेतृत्व

परवानगी नसलेल्या तणनाशकाला अनुकूल जनूक (हर्बिसाइड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) वापरून बी.टी. बियाणांचे अवैध उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन केले आहे. राज्यातील आघाडीची बियाणे उत्पादक कंपनी असलेल्या महिको मॉन्सँटो बायोटेक (इंडिया) प्रा.लि., मॉन्सँटो होल्डींग्ज प्रा.लि., मॉन्सँटो इंडिया लिमिटेड या कंपन्यांसह इतर कंपन्यांचे हर्बिसाइड टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन असलेल्या बी.टी. कापूस बियाणांचे अनधिकृतपणे उत्पादन, साठवणूक व विक्री यातील सहभाग, भूमिकेची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कारवाईची शिफारस करण्याची जबाबदारी या ‘एसआयटीवर’ सोपवण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 4:02 am

Web Title: hail storm problem in maharashtra
Next Stories
1 १३ हजार अंगणवाडय़ा पोरक्या?
2 सैनिकांच्या अपमानाचा भाजपला विसर कसा?
3 राज्यपालांच्या आदेशानंतरही दोषींचा शोध लागेना!
Just Now!
X