दादर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अवैध बांधकामावर पालिकेने शुक्रवारी हातोडा चालवला. मात्र पालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप बँकेने केला आहे.
गेली ४० वर्षांहून अधिक काळ दादर येथे सुरू असलेल्या बँकेत अवैध बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयात आली होती. त्यानुसार पालिकेच्या २० कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कारवाई करत बँक व्यवस्थापकाच्या केबिनमधील बांधकाम तोडले. मात्र पालिकेने पूर्वसूचना न देता ही कारवाई केली व यात बँकेचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले, असे बँकेचे व्यवस्थापक महेंद्रकुमार यांनी सांगितले