News Flash

वांद्रे येथील झोपडय़ांच्या बेकायदा मजल्यांवर हातोडा

वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवरील अनधिकृत दोन आणि तीन मजले जमीनदोस्त केले

वांद्रे येथील के. सी. मार्ग येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवर अनधिकृतपणे मजले चढविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या

नर्गिस दत्त नगरमध्ये पालिकेची कारवाई
मुंबईमधील झोपडपट्टय़ांमध्ये चारमजली झोपडय़ा उभ्या राहू लागल्या असून हे अनधिकृत मजले पालिकेला डोकेदुखी बनू लागले आहेत. मात्र पालिकेने मंगळवारी वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवरील अनधिकृत दोन आणि तीन मजले जमीनदोस्त केले. पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेने ही कारवाई केली.
वांद्रे येथील के. सी. मार्ग येथील नर्गिस दत्त नगरमधील झोपडय़ांवर अनधिकृतपणे मजले चढविण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पालिकेचे साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १४ झोपडय़ांवरील दोन आणि तीन मजले तोडण्यात आले. दुय्यम अभियंता के. सी. दुरटकर, पदनिर्देशित अधिकारी प्रशांत तावडे यांच्यासह १५ पालिका कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. मंगळवारी दिवसभरात १४ झोपडय़ांवरील अनधिकृत दुसरा आणि तिसरा मजला तोडण्यात आला. आणखी काही झोपडय़ांवरील अनधिकृत मजले बुधवारी तोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

‘म्हाडा’च्या भूखंडावर ही झोपडपट्टी उभी राहिली असून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनाही मंजूर करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही झोपडपट्टीवासीयांनी झोपडय़ांवर मजले चढविण्याचा सपाटा लावला होता. स्थानिक आमदार आणि रहिवाशांकडून याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयात तक्रारी करण्यात येत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 6:30 am

Web Title: hammer on illegal floors in bandra slum area
टॅग : Bandra,Slum Area
Next Stories
1 शोभायात्रा, सत्यनारायणावरही ध्वनिमर्यादा
2 काशिमीरा येथे अल्पवयीन मुलीवर निकटवर्तीयाकडून लैंगिक अत्याचार
3 ‘मिलीबग’ कीटकांपासून मरणाऱ्या झाडांसाठी तातडीने उपाययोजना करा!
Just Now!
X