19 September 2020

News Flash

एअर इंडियाच्या ग्वाल्हेरला जाणाऱ्या विमानात अपंग तरुणीला मज्जाव

ग्वाल्हेरला एक परिषदेत वक्ता म्हणून विराली मोदीला आमंत्रित केले

(संग्रहित छायाचित्र)

अपंग प्रवाशांच्या प्रश्नावर ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकणाऱ्या २८ वर्षीय तरुणीला एअर इंडिया विमानवाहतूक कंपनीकडून विमानात जाण्यास मज्जाव करण्यात आला. मुंबईहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या या विमानात चाकीखुर्ची घेऊन जाण्याची यंत्रणा नसल्याचे सांगून एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणीला विमानात बसू दिले नाही.

शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरला एक परिषदेत वक्ता म्हणून विराली मोदीला आमंत्रित केले होते. विरालीने शुक्रवारी सकाळी १०.३० चे एटीआर मुंबई ते ग्वाल्हेर या विमानाची नोंदणी केली होती. ऑनलाईन तिकिट काढताना तिने अपंग असल्याचे नमूद केले होते. शुक्रवारी सकाळी साधारण ७.३० वाजता विराली तिच्या आईसोबत मुंबई विमानतळावर दाखल झाली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी ग्वाल्हेरच्या विमानाचा आकार लहान असल्याने येथे चाकीखुर्चीने जाता येणार नसल्याचे सांगितले. तिकिटाची नोंदणी करताना अपंग असल्याची माहिती दिल्याचे विरालीने सांगितले होते. तरीही विरालीला आत नेण्यास मनाई केली जात होती.

विरालीला दोन्ही हाताला पकडून विमानात बसविण्यात यावे, असा सल्ला विमानतळावरील व्यवस्थापकानी दिला. विराली यासाठी तयार झाली. या गोंधळामुळे विमान अर्धा तास उशिरा सुटले. याच विमानात अभिनेता पीयुश मिश्रा उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत एअर इंडियाच्या व्यवस्थापकांशी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला.

एअर इंडिया अंतर्गत अलायन्स या कंपनीच्या विमानांचा आकार लहान असल्याने येथील कुठल्याच विमानात चाकीखूर्ची जाण्याची सुविधा नसते. त्यामुळे त्या व्यक्तीला उचलून आणणे हा एकमेव पर्याय असतो, असे एअर इंडियाचे धनंजय कुमार यांनी सांगितले.

परदेशात महाविद्यालय, रुग्णालये, मॉल येथे अपंगासाठी पुरेशी सुविधा आहे. तेथे असेपर्यंत अपंग असल्याची जाणीव कधीच झाली नाही मात्र भारतात आल्यापासून प्रत्येक प्रवासात मी अपंग असल्याची जाणीव करुन दिली जाते.  -विराली, तरुणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 12:57 am

Web Title: handicapped woman ban in air india
Next Stories
1 प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंची लोकायुक्तांमार्फत चौकशी; मुख्यमंत्र्यांची घोषणा
2 खचलेल्या रस्त्यामुळे दोन तरुणांचा बळी?
3 जाहीर निकालांतही गोंधळ
Just Now!
X