16 December 2017

News Flash

हॅप्पी बर्थ डे पाण्डेजी!

बॉलिवूडमध्ये दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमान खानच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम बॉलिवूडने

प्रतिनिधी , मुंबई | Updated: December 28, 2012 3:51 AM

बॉलिवूडमध्ये दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमान खानच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम बॉलिवूडने सलमानला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सलमानला ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर उभे राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याचा वाढदिवस असल्याने त्याला हजर न राहण्याची सुटही देण्यात आली. विशेष म्हणजे ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या दोन्ही हिट चित्रपटांमुळे चुलबुल पाण्डे अशी ओळख निर्माण झालेल्या सलमानला अनेकांनी ‘हॅप्पी बर्थ डे पाण्डेजी’ अशाच शुभेच्छा दिल्या.
बॉलिवूडमध्ये सध्या तिकीटबारीवर धंदा करणार हुकुमाचा एक्का म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. यंदा त्याच्या ‘एक था टायगर’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ या दोन्ही चित्रपटांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. ‘दबंग २’ने तर केवळ सहा दिवसांत शंभर कोटींचा गल्ला जमा केला. त्यामुळे सलमानच्या यंदाच्या वाढदिवसाला वेगळेच ग्लॅमर मिळाले.
सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या सहकलाकारांनी त्याला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यात अरबाज खान, प्रभुदेवा, करण जोहर यांचा समावेश होता. तर ‘दबंग’मध्ये त्याच्यासह काम केलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि सोनू सुद यांनी त्याला दबंग स्टाइलमध्येच शुभेच्छा दिल्या. सोनाक्षीने सलमानला ‘हॅप्पी बर्थ डे पाण्डेजी’ अशा खास शुभेच्छा दिल्या. तर सोनू सुदने ‘सलमान खान, नाम बहुत सुने हम तुम्हारा. हॅप्पी बर्थ डे चुलबुल पाण्डेजी’ या शब्दांत सलमानला शुभेच्छा दिल्या. मल्लिका शेरावत, दिव्या दत्ता, नेहा धुपिया यांनीही सलमानला शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशीच २००२ मधील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्याच्या सुनावणीची तारीख महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र त्याच्या वाढदिवसाचे औचित्य लक्षात घेऊन त्याला न्यायालयात हजर न राहण्याची परवानगी देण्यात आली.

First Published on December 28, 2012 3:51 am

Web Title: happy birthday salman khan
टॅग Salman Khan