News Flash

हार्बरवर लवकरच गोरेगाव-पनवेल लोकल

सध्या हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावर एकूण ४२ लोकल फेऱ्या होतात.

अंधेरी ते पनवेल अप-डाऊन मार्गावरील १८ फे ऱ्यांचा विस्तार

मुंबई : हार्बर मार्गावर आता गोरेगाव ते पनवेल लोकलही धावणे शक्य होणार आहे. पनवेल ते अंधेरी अशा अप व डाऊन मार्गावरील १८ लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी एका महिन्यानंतर के ली जाणार आहे. याबरोबरच सीएसएमटी ते अंधेरी ते सीएसएमटी मार्गावरील ४४ लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार होईल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सध्या हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावर एकूण ४२ लोकल फेऱ्या होतात. याशिवाय सीएसएमटी ते अंधेरी ते सीएसएमटी आणि पनवेल ते अंधेरी ते पनवेल मार्गावरही दररोज ६२ लोकल फे ऱ्या धावतात. परंतु गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागते. हीच परिस्थिती नवी मुंबईकरांचीही होते. त्यांना अंधेरी स्थानकात उतरल्यानंतर गोरेगावपर्यंत जाण्यासाठीही पुन्हा दुसऱ्या लोकलचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामुळे गोरेगाव ते पनवेल अशी थेट हार्बर

सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून होऊ लागली. त्यानंतर गोरेगाव ते पनवेल लोकलचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत होते.

गोरेगावपर्यंत फेऱ्या

२०२० मध्ये हार्बरवरील अंधेरीपर्यंतच्या एकूण ६२ लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याची अंमलबजावणीही केली जाणार होती. परंतु  टाळेबंदीमुळे ते रखडले. हार्बवरील फेऱ्यांच्या विस्ताराच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी एका महिन्यानंतर करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाने के ला आहे. यात अंधेरी ते पनवेल लोकल फे ऱ्या गोरेगावमधून सुटतील, तर पनवेलहून अंधेरीपर्यंत जाणाऱ्या लोकल गोरेगावपर्यंत धावतील. सीएसएमटी ते अंधेरी असलेल्या लोकल फेऱ्यादेखील गोरेगावपर्यंत धावणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 3:05 am

Web Title: harbor railway line goregaon panvel local train service akp 94
Next Stories
1 मराठी मालिकांचा आता अन्य भाषांमध्ये रिमेक
2 तंजावरच्या मराठी राजवटीचा इतिहास प्रकाशझोतात
3 मुंबईत परजिल्ह्यातून येणारे दूध भेसळमुक्त
Just Now!
X