*कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर.
*कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ४.००.
*परिणाम- ठाणे रेल्वेस्थानकापासून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद मार्गावरील वाहतूक मुलुंड ते परळ स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. सीएसटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.०८ ते दुपारी २.५१ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहेत.
*कुठे- कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन हार्बर मार्गावर.
*कधी- सकाळी ११ ते दुपारी ३.
*परिणाम- सीएसटीहून पनवेल, बेलापूर व वाशीकडे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक, तसेच पनवेल, बेलापूर व वाशीहून सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ांची वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेल दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वेमार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर लिंक किंवा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.