29 September 2020

News Flash

हार्बर विस्कळीत

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे बुधवारी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

| March 12, 2015 01:05 am

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे बुधवारी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वडाळा येथील रावळी जंक्शन येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे या मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल सुमारे तासभर जागीच खोळंबली होती. या बिघाडामुळे दिवसभरातील २० उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.  त्यामुळे अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरुन रेल्वे मार्गावरुन चालणे पसंत केले. बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोन तासानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरु झाली. दरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले नगरातील नागरिकांनी किमान सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2015 1:05 am

Web Title: harbour line services disturbed 2
टॅग Harbour
Next Stories
1 नार-पार प्रकल्पातून गुजरातला जाणारे पाणी रोखा -भुजबळ
2 ‘मैत्री विनंती’मुळे विद्यार्थ्यांचा बळी
3 यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराचे आज वितरण
Just Now!
X