News Flash

गर्दीच्या वेळी हार्बर विस्कळीत

वाशीकडे जाणारी उपनगरी गाडी गुरुवारी सायंकाळी वाशी खाडी पुलाजवळ बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांच्या रांगा

| April 26, 2013 04:46 am

वाशीकडे जाणारी उपनगरी गाडी गुरुवारी सायंकाळी वाशी खाडी पुलाजवळ बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांच्या रांगा लागल्या. तसेच हार्बर मार्गावरील उपनगरी वाहतूक रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली होती.
सीएसटीवरून वाशीकडे जाणारी गाडी मानखुर्द स्थानकाच्या पुढे वाशी पुलाजवळ सायंकाळी ७.२२ वाजता तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. गाडीच्या एका युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी बंद पडल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री ८.१२ वाजता गाडीतील बिघाड दूर करण्यात तंत्रज्ञांना यश आले आणि गाडी पुढे नेण्यात आली. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या रांगा थेट कुर्ला स्थानकापर्यंत लागल्या होत्या. पनवेलकडे जाणाऱ्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वाशी पुलाजवळ गाडी बंद पडल्यानंतर प्रवाशांनी उतरून पुढे जाण्यास सुरुवात केली. काहींनी जवळच असलेल्या महामार्गावर जाऊन तेथे बेस्टच्या बसेस तसेच मिळेल त्या वाहनांनी वाशीपर्यंत जाणे पसंत केले. यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली होती. त्यातच मानखुर्द येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:46 am

Web Title: harbour railway disturbed in crowded hours
टॅग : Harbour,Railway
Next Stories
1 रेल्वे आरक्षणाची मुदत पुन्हा ६० दिवसांवर
2 कारवाईला न घाबरता ‘मार्ड’चे डॉक्टर संपावर ठाम
3 राज ठाकरेंविरुद्धच्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाकडून पुन्हा नोंद
Just Now!
X