News Flash

लोहारिया हत्येप्रकरणी बिजलानी यांचा जामीन फेटाळला

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आरोपी सुरेश बिजलानी यांची जामीन याचिका फेटाळली.

| December 23, 2013 07:21 am

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुनील लोहारिया यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आरोपी सुरेश बिजलानी यांची जामीन याचिका फेटाळली.
बिजलानी यांच्याकडून लोहारिया यांच्या मुलाच्या जीवास धोका असल्यामुळे याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीला जामीन दिल्यास मृत व्यक्तीच्या मुलाच्या जीवास धोका आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देता येणार नाही, असे न्या. एम. एल. ताहिलियानी यांनी स्पष्ट केले. बिजलानी यांना जामीनावर सोडल्यास ते पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. लोहारिया यांच्या हत्येनंतर मोठ्या कालावधीसाठी बिजलानी फरार होते, हा मुद्दाही न्यायालयाने निकाल देताना विचारात घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 7:21 am

Web Title: hc rejects bail plea of builder bijlani in loharia murder case
Next Stories
1 एसएनडीटीतील विद्यार्थिनी जागतिक आव्हाने पेलण्यास समर्थ – मुख्यमंत्री
2 फुकटय़ा प्रवाशांवर पश्चिम रेल्वेचा बडगा
3 म्हाडाने ‘अपात्र’ शिक्का मारल्याने सात कुटुंबे रस्त्यावर
Just Now!
X