01 March 2021

News Flash

एचडीएफसीच्या ‘त्या’ बेपत्ता अधिकाऱ्याची हत्या? आरोपीला अटक

हत्येचे कारण उघड झाले नसून अद्याप मृतदेहही सापडलेला नाही

सिद्धार्थ संघवी

 

एचडीएफसी बँकेचे बेपत्ता झालेले अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाली असल्याचा दावा या कटातील आरोपीकडून करण्यात आला आहे. पोलिसांना या प्रकरणी तपास करत असताना एक आरोपी हाती लागला असून त्याने याबाबत कबुली दिली आहे. या आरोपीचे नाव अद्याप उघड करण्यात आले नाही. मात्र अद्याप संघवी यांचा मृतदेह सापडलेला नसून ही हत्या करण्यामागे नेमके काय कारण होते हे समोर आलेले नाही. एचडीएफसीमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या संघवी यांचे लोअर परेल येथील कमला मिल येथे ऑफीस आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी ऑफीसला आले. मात्र सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

संघवी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह मलबार हिल येथे राहतात. मिसिंगची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. त्यांची चारचाकी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली आहे. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या हत्येमागे वैयक्तिक कारण असल्याचेही ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने सांगितले आहे. पुढील प्रकरणाचा तपास सुरु असून या प्रकरणातील इतर आरोपींचा मुंबई आणि नवी मुंबई पोलीस शोध घेत आहेत. आरोपी सतत आपला जबाब बदलत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संघवी ऑफीसमधून निघाले. कार्यालयातून बाहेर पडताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. मात्र, कमला मिलमधून त्यांची कार बाहेर पडताना दिसली नाही’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कमला मिलमधून बाहेर पडण्यापूर्वीच संघवी यांचा फोन बंद होता. रात्री १० पर्यंत संघवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 4:45 pm

Web Title: hdfc vice president siddharth sanghvi was missing accused detain car found in koparkhairane murder
Next Stories
1 उंटाची तस्करी करणारा ट्रक येडशीत पकडला
2 महावितरणची ऑनलाइन वीजबिल भरणा सेवा बंद, ग्राहकांची गैरसोय
3 राज ठाकरेंच्या मनसेचा काँग्रेसच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा
Just Now!
X