घाटकोपरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. बेडशीटमध्ये गुंडाळून हा मृतदेह घाटकोपर पश्चिमेला एका नाल्याजवळ टाकून देण्यात आला होता. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याविहार येथील एसटी वर्कशॉपच्या बाहेर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह पाहिला तेव्हा त्याचं शीर आणि पायाचा खालील भाग कापला असल्याचं निष्पन्न झालं.

मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. मॉर्निग वॉकसाठी आलेल्या दोन महिलांनी सर्वात प्रथम मृतदेह पाहिला असल्याचं एका स्थानिकाने सांगितलं आहे. “सर्वात आधी त्यांना कोणीतरी कचरा टाकला असावा असं वाटलं. त्यांनी वर्कशॉपच्या सुरक्षारक्षकांना यासंबंधी कळवलं. कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता बेडशीटवर रक्ताचे डाग असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला,” असं स्थानिकाने सांगितलं आहे.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात

घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित महिलेचं वय ३० च्या आसपास असावं असा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे”. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही माहिती मिळतीये का यासाठी प्रयत्न करत आहेत.