आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांकडून संके तस्थळ विकसित

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण यांमुळे एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्यास त्याचे संपूर्ण कु टुंब चिंतेत पडते. कु ठे संपर्क  साधावा, कोणत्या रुग्णालयात जावे यांविषयी अनभिज्ञता असल्याने उपचार मिळण्यास उशीर होतो. रुग्णांची ही दमछाक टाळण्यासाठी आयआयटी मुंबईचे संशोधक प्रा. जितेंद्र शहा यांनी एक संके तस्थळ विकसित के ले आहे. करोना काळातच नव्हे तर त्यानंतरही रुग्णांना या संके तस्थळाच्या मदतीने आरोग्य केंद्रांची महिती मिळेल.

प्रा. शहा यांनी २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती संके तस्थळावर दिली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या संके तस्थळावरून इतर विविध प्रकारची आरोग्य केंद्रे, विशेषत: कोव्हीड समर्पित आरोग्य केंद्रे, दक्षता केंद्रे आणि रुग्णालये यांची माहिती घेतली आहे. एखाद्याला प्रकारची आरोग्य सेवा हवी असल्यास   https://makerghat.urbansciences.in/dashboard/health  या संके तस्थळाला भेट द्यावी. तेथे ‘सिलेक्ट हेल्थ फॅसिलिटी व्ह्य़ू’ यावर क्लिक करून ‘नेव्हिगेटेड एरिआ व्ह्य़ू’वर क्लिक करावे. त्यानंतर स्वत:चे राज्य, जिल्हा व पिनकोड निवडावा. त्याच्या खाली ‘सिलेक्ट हेल्थ फॅ सिलिटीज’ नावाच्या पट्टीवर क्लिक करावे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रे, अ‍ॅलोपथी रुग्णालये, इतर रुग्णालये असे विविध पर्याय उपलब्ध होतील. कोव्हीड समर्पित रुग्णालये, कोव्हीड आरोग्य कें द्रे यांचीही माहिती मिळेल.

‘सेट लोके शन’या पर्यायावर क्लिक करून अपेक्षित अंतरावरील आरोग्य के ंद्रांचा शोध घेता येईल. एखाद्या पर्यायावर क्लिक के ल्यानंतर नकाशात ठिपक्यांच्या सहाय्याने संबंधित ठिकाण दाखवले जाईल. ठिपक्यावर क्लिक के ल्यास आरोग्य कें द्राचे नाव, प्रकार, विलगीकरण खाटांची संख्या, अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या, कृत्रिम श्वसन यंत्रणेची संख्या, पत्ता, संके तस्थळ, इत्यादी माहिती उपलब्ध होईल. उपलब्ध माहितीच प्रा. शहा यांना या प्रसिद्ध करता आली आहे. मात्र, भविष्यात संके त स्थळ उर्वरित माहीती प्रसिद्ध के ली जाणार असल्याचे प्रा. शहा यांनी सांगितले.

जनतेसाठी उपयुक्त असलेली माहिती फक्त सरकारच्या हातात असून उपयोग नाही. ती जनतेच्या हाती असेल तरच प्रशासन सुरळीत होईल. शिवाय या संके तस्थळावरील माहिती मोफत उपलब्ध आहे.

– प्रा. जितेंद्र शहा