नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने पाण्याच्या नमुन्यांची तापसणी करण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यात आणखी ९० प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत.
राज्यात पाण्याचे नमुने तपासण्यासाठी सध्या ३० प्रयोगशाळा सुरू आहेत. ही संख्या कमी असल्यानेच या प्रयोगशाळा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. या सर्व प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणा पाण्याचे नमुने या प्रयोगशाळांमध्ये पाठवू शकतात. राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी करण्यात येतात.
जनतेला शुद्ध पाणी मिळावे या उद्देशानेच या प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत. गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यास त्या भागातील पाण्याचे नमुने तपासले जातील.