News Flash

सलाम! आई ICU मध्ये असूनही करोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजेश टोपे यांच्या कर्तव्यदक्षतेचं सगळ्यात स्तरातून कौतुक होतं आहे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.  राज्यातल्या करोनाग्रस्तांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे डोळ्यात तेल घालून दिवसभर झटत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा, मुलाखती, मीडियाशी बोलणं. केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं. करोनाग्रस्त वाढू नयेत यासाठीची खबरदारी घेणं यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आईला ICU म्हणजेच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तरीही अथकपणे ते राज्यातील करोनाग्रस्तांची चिंता करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होतं आहे.

राजेश टोपे यांच्या आईवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र टोपे यांना आईची भेट घेण्यासाठी मिनिटभराचाही वेळ मिळू शकलेला नाही. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे करोनाचा महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव. हा प्रादुर्भाव रोखण्याचं मोठं आव्हान राजेश टोपे यांच्यासमोर आहे. अशावेळी त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेवत जनतेच्या सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं आहे. त्यांची ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा राजेश टोपे यांनी पहिल्यांदा करोनाबाबत निवेदन दिले तेव्हाच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केलं. घरातील अडचण विसरुन तुम्ही राज्यासाठी झटत आहात असे गौरवोद्गार सभापतींनी काढले होते. महाराष्ट्र स्टेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यासाठी राजेश टोपे विशेष प्रयत्न करत आहेत. अनेक कठोर निर्णयही त्यांनी सहजतेने घेतले आहेत. पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांचीही उत्तरं ते शांतपणे देताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:26 pm

Web Title: health minister rajesh tope mother in hospital but he still doing efforts in maharashtra against corona virus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : बोगस आणि खरं सॅनिटायझर कसं ओळखाल?
2 Coronavirus: हातावर क्वारंटाईनचा शिक्का असतानाही मुंबई सेंट्रलला ते सहा जण ट्रेनमध्ये चढले आणि…
3 ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ मुंबई पोलिसांचे भन्नाट मीम्स
Just Now!
X