26 February 2021

News Flash

मुंबईत पावसाची शक्यता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे.

यंदा पावसाची लक्षणे लवकर दिसू लागली असून ३० मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ तासांमध्ये चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. मात्र हे वादळ पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय समुद्र किनारपट्टीपासून दूर जाईल. त्यामुळे भारतीय समुद्र किनारपट्टीला धोका उद्भवण्याची शक्यता कमी आहे. मात्र कोकणपट्टीत वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढत आहे. परिणामी येत्या २४ तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास पश्चिम दिशेने सुरू होणार आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. असे असले तरी त्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला आहे.
चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर वेगवान वारे वाहू लागतील आणि समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाच्या प्रभावामुळे कोकणात वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 4:27 am

Web Title: heavy downpour expected today too
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 इंद्राणीचा आत्महत्येचा प्रयत्न नव्हता!
2 डासग्रस्त मुंबईच्या मदतीला चतुरांची फौज! ६५ हजार मैलांवरून आगमन..
3 आता डेब्रिज घोटाळा!
Just Now!
X