News Flash

शोध सुरूच.. ;१५ मृतदेह सापडले, अद्याप १८ बेपत्ता

शक्तीशाली चुंबकाच्या मदतीने सावित्रीत नदीमध्ये बुडालेल्या वाहनांचा शोध सुरू होता.

एरवी शांत असलेल्या परंतु अतिपावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या सावित्री नदीचा उगम पावतो महाबळेश्वरात. तेथून ती पोलादपूरमार्गे महाडला वळते आणि पुढे दासगाव, आंबेत, हरिहरेश्वरमार्गे रत्नागिरी जिल्ह्य़ातील बाणकोट येथील खाडीत समुद्राला मिळते. हरिहरेश्वपर्यंतचा नदीचा हा प्रवास किनारपट्टीच्या मार्गाने मोजायचा झाल्यास ४० किलोमीटर आहे. मंगळवारी त्या काळरात्री दोन एसटी बस आणि तीन लहान वाहने नदीत कोसळल्यानंतर त्यातील बेपत्ता प्रवाशांचे निष्प्राण देह आता हळूहळू हाती लागू लागले आहेत. नदीच्या प्रचंड प्रवाहात हे मृतदेह घटनास्थळाच्या ठिकाणाहून कैक किलोमीटर अंतरापर्यंत वाहात गेले आहेत. अजूनही १८ जणांचा शोध सुरूच आहे..

बुधवारी रात्री उशिरापर्यंत १५ मृतदेह हाती लागले.

  • केंबुर्ली : रंजाना वाजे,  पांडुरंग घाग, बाळकृष्ण वरक, प्रभाकर शिर्के, अनिष बलेकर
  • म्हाप्रळ : सुनील बैकर, जयेश बाणे
  • हरेश्वर : शेवंती मिरगळ
  • दादली : आवेद चौगुले
  • आंजर्ले : श्रीकांत कांबळे
  • आंबेत : मंगेळ कातकर
  • राजेवाडी : स्नेहल बैकर
  • तोराडी : प्रशांत माने
  • वराडी : रमेश कदम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 7:52 am

Web Title: heavy metal thing found in savitri river near mumbai goa highway
Next Stories
1 पादचारी व्यवस्थापनाचा ‘स्कायफ्लॉप’
2 महापालिकेच्या नाकाखालीच खड्डे
3 प्रियकराने सेल्फी नष्ट न केल्याने तरुणीची आत्महत्या
Just Now!
X