पावसाळ्याचा धोका पाहून ३१ सप्टेंबरपर्यंत बंदी

मुंबई : भौगोलिक रचनेमुळे सखल भागात असलेल्या अंधेरी भुयारी मार्गात (सब वे) वेगाने पाणी साचण्याची शक्यता व त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती लक्षात घेऊन हा मार्ग ३१ सप्टेंबरपर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त (पश्चिाम उपनगरे) सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ते २० मिनिटे मुसळधार पाऊस झाल्यास अंधेरी सब वेत एक ते दीड फू ट पाणी साचते. शिवाय या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा अंदाज सहजासहजी वाहनचालकांना बांधता येत नाही. दिवसा सूर्यप्रकाशात वाहनचालकांना भुयारी मार्गात साचलेले पाणी चटकन दिसू शकते. मात्र रात्री अंधारात अंदाज बांधणे कठीण होऊन जाते. अंदाज चुकलेली वाहने पाण्यात अडकून बंद पडतात. रहदारी कमी असल्याने अन्य वाहनचालकांकडून मदत मिळण्याची शक्यताही कमी असते. याठिकाणी जीवित हानी होऊ शकते.  त्यामुळे हा भुयारी मार्ग ३१ सप्टेंबरपर्यंत रात्री १० ते पहाटे सहा या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे घार्गे यांनी स्पष्ट के ले.

अंधेरीच्या भुयारी मार्गात पाणी साचण्याचा वेग लक्षात घेऊन महापालिकेने हा मार्ग पुढील तीन महिन्यांसाठी पूर्ण वेळ बंद ठेवावा, अशी शिफारस वाहतूक पोलिसांना के ली होती. मात्र पूर्व-पश्चिाम भाग जोडणारा हा भुयारी मार्ग पश्चिाम उपनगरांतील रहदारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याने केवळ रात्री वाहतुकीसाठी बंदी करण्यात आली आहे.

पर्यायी वाहतूक मार्ग

जोगेश्वारी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल, अंधेरीतील गोपाळकृ ष्ण गोखले उड्डाणपुल आणि सांताक्रुझ येथील मिलन भुयारी मार्ग .