आधी ५२ गाड्या रद्द, दुसऱ्या दिवशी १५ सुरू; अनेक प्रवाशांचे तिकीट रद्द
मुंबई : पावसाचा फटका कोकण रेल्वेबरोबरच मुंबई ते पुणे मार्ग आणि हुबळी विभागालाही बसल्याने शुक्रवारी ५२ पेक्षा अधिक गाड्या २४ ते २८ जुलैदरम्यान रेल्वे प्रशासनाने अचानक रद्द के ल्या. परंतु पूर्ववत झालेली कोकण रेल्वे आणि आधीच मुंबई ते पुणे आणि इगतपुरी ते कसारा मार्गावरील प्रत्येकी दोन मार्ग पूर्ववत झालेले असतानाही घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचे आरक्षण रद्द झाले. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी यातील १५ गाड्या पुन्हा सुरू करत असल्याची घोषणा के ल्याने रेल्वे नियोजनाचा सावळागोंधळ समोर आला. यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.

चिपळूण ते कामठेदरम्यान रुळांवर आलेल्या पाण्यामुळे हा मार्ग बंदच होता. शनिवारी पहाटे पावणेचार वाजता मार्ग सुरू करण्यात आला आणि त्यानंतर कोकण रेल्वे पूर्ववत झाली. याआधी कर्जत ते लोणावळा मार्गालाही पावसाचा फटका बसला होता. या मार्गावर मोठ्या प्रमाणात काम करून या मार्गावरील डाऊन मार्ग आणि अप मार्ग २२ जुलैला रात्री पूर्ववत झाले. त्यानंतर मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वे सेवा हळूहळू सुरू झाली. परंतु हुबळी विभागात येथे शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम राज्यातील एक्स्प्रेस गाड्यांवर झाला. पंरतु मध्य रेल्वेने शुक्र वारी सायंकाळी राज्यातील ५२ गाड्या २४ जुलै ते २८ जुलैदरम्यान रद्द करत असल्याचे जाहीर के ले. त्यामुळे या दरम्यान ज्या प्रवाशांचे गाड्यांचे आरक्षण होते, ते रद्द झाले. त्याचे संदेशही प्रवाशांच्या भ्रमणध्वनीवर गेले. यात कोकण, पुणे मार्गासह अन्य मार्गावरील गाड्यांचा समावेश होता. तर अनेक गाड्या अप व डाऊन करणाऱ्या मुंबई मार्गावरीलही होत्या.

मात्र रद्द केलेल्या गाड्यांपैकी १५ गाड्या पुन्हा सुरू करत असल्याची माहिती शनिवारी मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यामध्ये दादर ते सावंतवाडी ते दादर, सीएसएमटी ते मंगलुरु ते सीएसएमटी, सीएसएमटी ते मडगाव ते सीएसएमटी, सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी, सीएसएमटी ते पुणे ते सीएसएमटीसह अन्य गाड्या आहेत.

काही मार्गिका बंद सध्या कसारा ते इगतपुरीदरम्यान तीन मार्गिका असून यातील अप व डाऊन मार्गिका सुरू आहे. आणखी एक मधली मार्गिका कामानिमित्त बंदच आहे. तर कर्जत ते लोणावळादरम्यानही तीन मार्गिका असून डाऊन आणि मधली मार्गिका सुरू असून अप मार्गिके चे काम सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. परंतु यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झाला नसल्याचे ते म्हणाले.