News Flash

आजपासून जोरदार पावसाचा अंदाज

येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

संग्रहित छायाचित्र

राज्याच्या काही भागांमध्ये शुक्रवारपासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.

गुरुवारी मुंबई आणि महानगर परिसरात हलक्या पावसाचा शिडकावा झाला. गुरुवारी दिवसभरात मुंबई शहर आणि उपगनरात पाच मिमीपर्यंत,  ठाणे आणि परिसरात पाच ते दहा मिमी, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरात पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

पाऊस सक्रिय असल्याने  ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. बुधवार आणि गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.

१८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल. इतरत्र पाऊस कमी होईल.

पाऊस सक्रीय

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (१९ सप्टेंबर) कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:16 am

Web Title: heavy rain forecast from today abn 97
Next Stories
1 राज्यातील पाचवीचे वर्ग आता प्राथमिक शाळेत!
2 डॉ. प्रमोद चौधरी यांना जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्कार
3 पुणे शहर पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता
Just Now!
X