01 October 2020

News Flash

भातसा, वैतरणा तलाव क्षेत्रात दमदार पाऊस

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा व वैतरणा क्षेत्रातील तलावात जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व तलावांमध्ये शंभर

| June 23, 2015 04:30 am

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा व वैतरणा क्षेत्रातील तलावात जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व तलावांमध्ये शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून एका दिवसात तलावांच्या एकूण पाणीसाठय़ात दहा हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली. शहराला रोज सरासरी ३७५० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते.
मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांमध्ये आतापर्यंत तब्बल ९३१ मिमी आणि ८३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र पाणीपुरवठय़ामध्ये या दोन्ही तलावांचा विशेष उपयोग नसून मुंबईकरांची सर्व भिस्त ठाणे व नाशिकमधील तलावक्षेत्रावर असते. मुंबई- ठाण्यात चार दिवसात मुसळधार वृष्टी होत असताना या तलावात १० ते १५ मिमी पाऊस सुरू होता. मात्र रविवारी सर्व तलावात भरपूर पाऊस पडला.
मोडकसागरमध्ये १२१ मिमी, मध्य वैतरणा येथे १०५ मिमी तर अप्पर वैतरणा येथे १०४ मिली पाऊस पडला. तानसा येथे ७५ मिमी तर भातसा येथे १२१ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तलावातील एकूण पाणीसाठा दहा हजार दशलक्ष लिटरने वाढला. आजमितीला तलावातील एकूण जलसाठा १ लाख ९४ हजार ९४५ दशलक्ष लिटर आहे. गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबईतील कमाल तापमान २६ ते २७ अंश से. दरम्यान राहिले होते. मात्र सोमवारी पावसाच्या सरी ओसरल्या आणि कमाल तापमान तब्बल चार अंश से. ने वाढले. सोमवारी सांताक्रूझ येथे ३१.४अंश से. तर कुलाबा येथे २९.६. अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.

मुंबईत ९३ मिमी पाऊस
सलग चौथ्या दिवशी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात सांताक्रूझ येथे ९२.९ मिमी पाऊस पडला. गुरुवारपासून आतापर्यंत सांताक्रूझ येथे ६९६ मिमी पाऊस पडला आहे तर जूनमधील एकूण पाऊस ९५० मिमी झाला आहे. सोमवारी सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतली. पावसाच्या मध्यम सरी तसेच काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 4:30 am

Web Title: heavy rain in bhatsa vaitarna lakes area
Next Stories
1 महिला गुप्तहेरांच्या माहितीवरून छापासत्र
2 कोकणासाठी मध्य रेल्वेच्या ६० गणेशोत्सव विशेष गाडय़ा
3 तुंबलेल्या पाण्यावरून महापालिकेत खडाजंगी
Just Now!
X