24 September 2020

News Flash

मुंबईत मुसळधार, रस्ते वाहतुकीसोबतच लोकलही खोळंबली

मध्य रेल्वेची सेवा तब्बल अर्धा तास उशीराने सुरू आहे.

संग्रहीत छायाचित्र.

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली आहे. दादर, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत असून ठिकठिकाणी ट्राफीक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वांद्रे, माहिम, सांताक्रुझ या उपनगरांत देखील मुसळधार पाऊस पडत आहे. जेव्हीएलआरवर ‘एल अॅंड टी’जवळ टेम्पो बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. रस्ते वाहतुकीपाठोपाठ लोकल सेवा देखील रखडली आहे. मध्य रेल्वेची सेवा तब्बल अर्धा तास उशीराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे-कळवा दरम्यान लोकलमध्य तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 11:50 am

Web Title: heavy rain in mumbai road and train transport disturb
Next Stories
1 मुंबईतील ९० टक्के आगी शॉर्टसर्किटमुळे!
2 पावसात विजेचे रडगाणे!
3 मुंबईतील ६८ टक्के डॉक्टर तणावाखाली
Just Now!
X